Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा! लग्नात वऱ्हाड्यांनी असं काही केलं की नवरीच्या मेकअपची लागली वाट; VIDEO एकदा पाहाच

Wedding Funny Video: सोशल मीडियावर दरवेळी अनोख्या घटना पाहण्यासाठी मिळत असतात. त्यातच पुन्हा एकदा अशीच एक गमतीदार घटना समोर आली आहे. नक्की काय आहे व्हिडिओत ते पाहा.

Tanvi Pol

Funny Viral Video: लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. त्या दिवशी नवरा- नवरी खास दिसावेत शिवाय त्यांचे कपडे, मेकअप सर्व परिपूर्ण असावे, अशी सर्वांची इच्छा असते. मात्र, अनेकदा या आनंदाच्या क्षणी अशा काही गोष्टी घडतात, ज्याने संपूर्ण लग्न सोहळ्याचे रुपच बदलून जाते. सध्या अशाच काहीसा प्रकार एका लग्नसोहळ्यात घडलाय. जिथे वऱ्हाड्यांच्या एका कृतीमुळे चक्क नवरीच्या मेकअपची पार पाट लागली आहे.

VIDEO पाहून हसू आवरणार नाही!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल (Viral)झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं की, लग्नाच्या मंडपात नवरी नटून-थटून स्टेजवर उभी आहे. शिवाय तिने केसांची सुंदर अशी हेअरस्टाईही केली आहे. मात्र, लग्नात आलेल्या उत्साही वऱ्हांड्यांनी जो पार्टीमध्ये मारायचा स्प्रे असतो तोच नवरीच्या केसात मारला आहे, ज्यामुळे नवरीची संपूर्ण हेअरस्टाईल खराब झालेली आहे. काही वेळाने नवरीची मेकअप आर्टिस्ट येऊन तिची हेअरस्टाईल नीट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

लग्नातील हा प्रकार पाहून अनेकांनी हसू अनावर झालं तर काहींनी लगचे मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की हजारो लोकांनी अनेक लाईक्स आणि या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील maharashtra_remix_reel या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

हा व्हिडिओ (Video) क्षणार्धात व्हायरल झाला आणि अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स दिल्या. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''भारी दिसतय डिझाईन'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काही लोक असं करतात मुद्दाम'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''म्हणूनच आधीच्या नवरी मुलगी डोक्यावर पदर घेत होत्या'' अशा अनेक गमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT