Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अबब...! नवरदेवाची जंगी वरात; १०० घोड्यांमुळे शहर थांबलं;लोकं म्हणतात असं लग्न पहिल्यांदाच पाहिलं

Wedding Viral News: सोशल मीडियावर सध्या अनोख्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात नवरदेवाने गाडी नाही तर चक्क १०० घोड्यांवर लग्नाची मिरवणूक काढली आहे,व्हायरल व्हिडिओ पहाच.

Tanvi Pol

Unique Groom Entry Video: लग्नकार्य म्हडलं की प्रत्येक गोष्टींची जय्यद तयारीची लगबग सुरू असते.सुरू असलेल्या तयारीत नवदेव पासून नवरीच्या लहानातल्या लहान गोष्टीपासून ते लग्नातील पानपानाच्या वस्तूंचे बजेट ठरवावं लागतं.गेल्या काही वर्षापासून लग्न समारंभात वर आणि वधू यांची ग्रँड एन्ट्री आपल्याला दिसून येते.मग वधू-वरांची लग्नात एन्ट्री जबरदस्त होण्यासाठी लाखोंचा खर्च आणि अनोख्या कल्पना सुचवल्या जातात.अशातच नवरदेवाच्या एका अनोख्या लग्नातील एन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.जो नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या नवरदेवाचा व्हिडिओ गुजरात राज्यातील चोटिया येथील आहे,ज्यात वराने आणि त्यांच्या घरातील काही मंडळीने थेट १०० घोड्यांवर स्वार होत लग्न समारभांत एन्स्ट्री केली आहे.नवरदेवाने केलेल्या या हटके एन्ट्री चर्चा सध्या गुजरातमध्ये होतच आहे शिवाय सोशल मीडियावरही तूफान व्हिडिओ व्हायरल होत आहे.कोणताही डीजे आणि वाहनांचा आवाज न करता केलेली ही एन्ट्री प्रत्येकाच्या पसंतील आलेली आहे.

व्हायरल होत असलेली ही मिरवणूक गुजरातमधील खेर्डी गावातून निघालेली आणि चोटीला इथंपर्यंत होती,अशी तब्बल ही घोड्यांवरुन ही मिरवणूक १० किलोमीटर इवढी काढण्यात आली.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला वाहतुकीच्या या रस्त्यावरुन लग्नातील नवरदेव आणि त्यासोबत अनेकजण घोडेस्वारी करत मिरवणुकीचा आनंद घेत आहेत शिवाय मिरवणूक जात असताना त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे.

सध्या अनोख्या मिरवणुकाची व्हिडिओ एक्स या सोशस मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून,तो व्हिडिओ ''@tv13gujarati''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करुन २३ तास झाले असून आतापर्यंत लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : नवरदेवाच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT