Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आईशप्पथ! हळदीत काका-काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय तुफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका काका-काकूंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या वाऱ्याच्या वेगाने मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Dance Viral Video:

सोशल मिडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गमतीदार गोष्टींचे तर अनेकदा डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटनांचे मात्र यापलीकडे जाऊन भेभान होऊन डान्स करणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात, त्यात सध्या एका काका-काकूंचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या डान्स व्हिडिओला नेटकरी वर्गातून मोठी पसंती मिळत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक हळदीचा कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. या हळदीच्या निमित्ताने घरातील सदस्य आणि अनेक मित्र-मैत्रिणी डान्स करत आहेत, या सर्वांमध्ये तुम्हाला एक काका-काकू दिसून येत आहेत,जे अतिशय उत्साहाने आणि आनंदाने डान्स करत आहेत. काका तर अगदी प्रेमाने काकूंना उचलून घेऊन डान्स(Dance) करताना व्हिडिओत दिसेल, सर्व डान्स व्हिडिओ त्यांच्या घरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे,मात्र तो व्हिडिओ इन्स्टावरीलच ''misakshee'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. २ दिवस व्हिडिओ पोस्ट करुन तब्बल लाखोंच्या संख्येने व्हिडिओ व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लाईक्सही मिळालेले आहेत.

व्हायरल होत असलेला डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडकच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भारीच'' तर प्रतिक्रिया केलेल्या प्रत्येकाने कौतुकास्पदच प्रतिक्रिया केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

500 जणांचा मृत्यू; मशिद उद्ध्वस्त, सैन्याचे हवाई दलही संपुष्टात! भीषण मिसाइल हल्ल्याने जगात खळबळ

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT