Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

Teacher Fighting Video Viral: सरकारी शाळेत दोन शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर चांगलीच हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात तर कधी धक्कादायक असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये भर वर्गात विद्यार्थ्यांची नाही तर शिक्षकांची हाणामारी सुरू आहे. दोन शिक्षकांमध्ये चांगलीच जुंपली आहे याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

सारणगड - बिलाईगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. दोन शिक्षकांमध्ये वर्गातच विद्यार्थ्यांसमोर तुफान हाणामारी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्गात हिंदी विषयाचा तास सुरू होता. दरम्यान हिंदीचे शिक्षक विनित दुबे हे वर्गात शिकवण्यासाठी आले नाही. त्याच्याजागी मुलांना शिकवण्यासाठी मनोज कश्यप हे शिक्षक आले. मनोज कश्यप मुलांना शिकवत असताना विनीत दुबे देखील वर्गात आले आणि मनोज कश्यप यांनी तुम्ही शिकवू नका असे सांगितले. परंतू मनोज कश्यप यांनी ते ऐकले नाही यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. हे प्रकरण पुढे वाढतच राहिलं. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही शिक्षक हे वर्गात मागे जाऊन देखील भांडत आहे. एकमेकांची कॉलर पकडून मारताना दिसत आहे. शिक्षकांची ही मारामारी पाहून विद्यार्थी घाबरले. एक एक विद्यार्थी वर्गातून बाहेर जाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाळेतील शिक्षकांचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर पालकांनी देखील शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षक मारामारी करत असतील तर मुलांना काय शिकवण मिळेल हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

Maharashtra Live News Update: अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण होणार

Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

Nepal Protest: नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर आंदोलकांचा हल्ला; अनेकजण जखमी

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT