Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : हवेत ४००० फुटांवर पॅराग्लायडिंग करताना बेल्ट निघाला, ४ मिनिटपर्यंत हवेत लटकला; थरारक VIDEO समोर

Paragliding Ride Viral Video : पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळांपैकी एक खेळ आहे. या खेळामध्ये तुमचा जीव जाण्याची शक्यता असते. यायाच एक प्रत्यय दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paragliding Ride Accident Video

पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळांपैकी एक खेळ आहे. या खेळामध्ये तुमचा जीव जाण्याची शक्यता असते. यायाच एक प्रत्यय दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात दोन व्यक्ती पॅराग्लायडिंग आकाशात झेप घेताना दिसत आहे,मात्र पॅराग्लायडिंग करण्याआधी सेफ्टीसाठी लावण्यात आलेला एका व्यक्तीच्या बेल्ट निघतो आणि तो तसाच पॅराग्लायडिंगच्या रोपला पकडला दिसून येत आहे. व्हिडिओ पाहून तुमच्या अगांवर काटा नक्कीच येईल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ स्विट्जरलैंडमधील असल्याचे समजत असून अमेरिकेतील एक जोडपे स्विट्जरलैंडमध्ये पर्यटनासाठी आले होते. दरम्यान तो व्यक्ती पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करण्याचा अनुभव घेणारा होता.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती पॅराग्लायडिंगच्या मदतीने हवेत झेप घेत आहेत. झेप घेतल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तीला समजते की पॅराग्लायडिंग करताना वापरण्यात येणारा सेफ्टी बेल्ट व्यवस्थित बांधला गेला नाही. मात्र हे समजेपर्यंत उशिर झाला होता. ते दोघं म्हणजे पर्यटनासाठी आलेला व्यक्ती आणि पॅराग्लायडिंगचा पायलट असे दोंघ. व्यक्तीला समजेपर्यंत तो जमिनीपासून भरपूर अंतर आकाशात गेला होता.

मात्र पायलटला पकडून आणि पॅराग्लायडिंगच्या रोडला पकडून व्यक्तीने जमिनीवर पॅराग्लायडिंग उतरेपर्यंत हात काही सोडला नाही. काही मिनिटांनंतर पॅराग्लायडिंग परत त्याच्या लँड होण्याच्या जागी पोहचता व्यक्तीने हात सोडून जमिनीवर पडतो.साधारण ४००० हजार फीट ऊंचीवर सर्व थरार सुरु असून ४ मिनिटापर्यंत तो व्यक्ती हवेत लटकलेला होता. या थरारक घटनेत व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत झालेली असल्याचे समजते.

व्हायरल झालेला व्हिडिओ MetDaan Tips या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. याआधी पॅराग्लायडिंग तसेच अनेक साहसी खेळ करताना अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT