Tiger Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Tiger Viral Video: स्विमिंग पूलमध्ये चिल करत तरुणीने वाघाला केलं किस; पुढे जे घडलं ते तुम्हीच पाहा

Tiger kiss a Lady Viral video: सोशल मीडियावर सध्या एका वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वाघ स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक तरुणीदेखील दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात अनेक व्यक्ती नेहमी काही न काही अतरंगी करताना दिसतात. कधीतरी एखादा जण जुगाड करतो तर कोणीतरी डान्सचे व्हिडिओ शेअर करतो. परंतु तुम्हील कधी जंगलातील सर्वात बलाढ्य प्राणी म्हणजेच वाघाला एखाद्या व्यक्तीसोबत स्विमिंग पूलमध्ये खेळताना पाहिलंय का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

वाघाचे नाव जरी घेतलं तरी सर्वांना भीती वाटते. वाघाला पिंजऱ्यात जरी पाहिलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. जंगातील इतर प्राणीदेखील वाघाला घाबरतात. परंतु जर कोणी वाघासोबत खेळताना दिसलं तर? एक तरुणी वाघासोबत स्विमिंग पूलमध्ये खेळताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक तरुणी स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहे. फक्त तरुणीच नव्हे तर एक वाघदेखील तिच्यासोबत पोहताना दिसत आहे. या वाघाने तरुणीला मिठी मारल्याचे दिसत आहे. त्यानंतर तरुणी वाघासोबत पोझ देतानादेखील दिसत आहे. या फोटोवर तिने माझा टायगर फ्रेंड लक्ष्मण असे कॅप्शन दिले आहे.

rio_lilly या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'बापरे! वाघासोबत फोटोशूट', 'फोटोशूटच्या नादात वाघ खाऊन टाकेल तुला' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT