Madhya Pradesh: सोशल मीडियावर अनेकदा मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गुन्हेगारीच्या घटना घडतात तर कधी अपघाताच्या. पंरतू पुन्हा एकदा सोशल मीडियावर मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या चोरीची घटना व्हायरल होत आहे. ज्यात थेट पेट्रोल पंपाचे कार्यालय तोटून चोरी झालेली आहे, मात्र या घटनेत चोराने चोरी करण्यापूर्वी देवाच्या पाया पडत चोरीचे काम पूर्ण केलेले आहे. नेमके या व्हिडिओत पुढे काय घडते ते एकदा पाहा.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पेट्रोल पंपाचे ऑफिस दिसत आहे. काही वेळात एक व्यक्तीचा ऑफिसचा दरवाजाचे कुलूप तोडून आत शिरतो. व्यक्तीने त्याची ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल लावलेला आहे. काही वेळात तो ऑफिसमध्ये असलेल्या देवाच्या पाया पडतो त्यानंतर सर्व दिशेने कोण येत नसल्याचे पाहतो. व्हिडिओच्या शेवटी चोराने ऑफिसमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काही तरी लावतो, जेणेकरुन चोरीची पुढील घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून. सध्या सर्व या घटनेचा व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टाईम्स ऑफ इंडियानूसार व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असून व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे मात्र तो व्हिडिओ ''timesofindia'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पाहिला गेला आहे शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील अनेकांनी गमतीदार तर बऱ्याचजणांनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''अच्छे चांगल्या घरातील चोर आहे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''काम करण्यापूर्वी देवाचे नाव घ्या'' तर अजून एका यूजरने,''संस्कार'' असे लिहिले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.