Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बाबो! चिपळूणच्या पेट्रोल पंपाजवळ आली महाकाय मगर, नागरिकांमध्ये भीती; पाहा VIDEO

Crocodile In Chiplun : मुंबईसह रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.याचा परिणाम नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.परंतू सध्या चिपळूनमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या प्रत्येक राज्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. या पावसाचा परिणाम अनेक ठिकाणी पूर आलेला आहे, तर या पूरामुळे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जमा झालेले आहे. या पावसाच्या पाण्यातून वाहत जाऊन अनेकांच्या घरी साप तर विंचू असे प्राणी घरात आढळून आले आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतू सोशल मीडियावर एक भर रस्त्यात मगरीचा मुक्त संचार होत असलेल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) रत्नागिरीमधील चिपळूणचा आहे. जिथे चिपळूणच्या मेहता पेट्रोल पंपाजवळ मगर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमधील मगरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्या व्हिडिओ नदीची पाणी पातळी वाढल्याने मगर रस्त्यावर आली होती.त्यामुळे त्या वेळेसही नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर चिपळूणच्या मेहता पेट्रोल पंपाजवळचा आहे.त्यात पेट्रोल(Petrol) पंपाजवळ एक गाडी उभी आहे, त्या गाडीच्या पाठी मागून एक मगर येताना दिसत आहे. काही वेळाने ती मगर कोणाला ही इजा देता एका बाजून निघून जाते. मगरीचा आकार लहान आहे परंतू तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणाला हादरा

Maharashtra Live News Update: नामांकित पुमा कंपनीचे बनावट उत्पादन विकणाऱ्या दुकानांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

पाषाणहृदयी! मोठ्या बहिणीच्या दीरासाठी नवऱ्याची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली

Sugar Side Effects: अचानक साखर खाणं सोडणं पडेल महागात, चेहऱ्यावर दिसतील हे गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT