Pune weather Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Pune Viral Video: सध्या सोशल मीडियावर पुणे शहरात पसरलेल्या धुक्याच्या वातावरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Pune weather: गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थंडीची लाट पसरली आहे. मात्र त्यातच पुणे जिल्हा प्रत्येक शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. पुणे शहराला थंडीने गारठले असून पुण्याचा पारा तब्बल १०.८ अंशावर पोहचल आहे. सध्या सोशल मीडियावर पुणे शहरातील सकाळच्या वातावरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून प्रत्येक नेटकरी थंडीने गारठला आहे.

नोव्हेंबर महिना सुरु होताच प्रत्येकजण थंडीचे(Winter) गरम कपडे परिधान करण्यास सुरुवात करतो. मात्र मुंबई असो वा पुणे या शहरात गेल्या काही वर्षापासून थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोशल मीडियावर पुणे(Pune) शहरातील सकाळी सकाळी अनेक ठिकाणी थंडीचे वातावरण धुके पडलेले पाहण्यासाठी मिळाले आहे.

पुणे शहरातील थंडीचा पारा १०.८ अंशावर पोहचल्याने प्रत्येकाला थंडीने हुडहुडी भरु लागली आहे. या थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहे. सकाळी घराबाहेर पडताना नागरीक ऊबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडतांना दिसत आहे. मात्र या थंडीचा फायदा गहू,हरभरा या पिकांना होणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

पुणे शहरातील सकाळी पडलेल्या धुक्यांचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता, सकाळचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपआपल्या कामासाठी वाहन घेऊन निघालेला आहे, पंरतू या थंडी प्रत्येकजण गारठलेला दिसून येत आहे.

थंडीमुळे आजाराचा धोका बळावला

पुणे शहरात गेल्या काही दिवासात थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र, या सोबतच सर्दी आणि खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही या बरोबरीने वाढ होत आहे, असे चित्र रुग्णालयात दिसत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT