Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Satara Cloudburst: रस्त्यावर खळखळ पाणी, धारेत वाहनं अडकलेली; ढगसदृश्य पाऊस बघून थरकाप उडेल

Satara Heavy Rain: सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सून पुर्व पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. कुठे पुरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील एक पावसाचा हाहाकार दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Satara Flood Video: सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषत, सातारा तालुक्यातील चिंचणेर आणि वंदन परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडला असून, त्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाण्याचा रौद्र रूप इतका भयानक आहे की लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे..

चिंचणेर वंदन येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे(Flood) बाजार पटांगणावर पाणी आले. या पटांगणावर लावलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्या पाण्यामध्ये गेली. यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेसीबी चालक उमेश राठोड याने तात्काळ जेसीबीच्या मदतीने प्रत्येक वाहन या पटांगणावरून सुरक्षित स्थळी हलवले.

यामध्ये एक कार ओढ्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात थोडक्यात बचावली. जेसीबी चालकाने या पटांगणावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जेसीबी चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावरही या घटनेचे सर्व व्हिडिओ आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत.

सातारा जिल्ह्यासोबत महाराष्ट्रातील लातूर आणि रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस होत आहे. सोशल मीडियावर तेथील अनेत पुरजन्स परिस्थितीचे व्हिडिओ (Video)पाहण्यासाठी मिळत आहेत. सातारा जिल्ह्यातील तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT