Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Video: किती ते प्रेम! बहिण आणि कर्तव्य दोन्हींचं ओझं पेलणारा भाऊ; कौतुकास्पद VIDEO व्हायरल

Brother and Sister Viral Video: बहिण-भावाचं नातं जसं अनोखं असतं तसंच खरोखरच खूप पवित्र आणि प्रेमळ देखील असतं. भावंडं कितीही भांडतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Brother and Sister Viral Video

बहिण-भावाचं नातं जसं अनोखं असतं तसंच खरोखरच खूप पवित्र आणि प्रेमळ देखील असतं. भावंडं कितीही भांडतील, मस्ती करतील पण एकमेकांबद्दल त्यांचा जिव्हाळा कधीच कमी होत नाही. कायम भांडण जरी करत असतील तरीही गरज पडेल तेव्हा ते दोघेही एकमेकांसाठी ढाल बनतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच बहिणाबाई आणि भाऊरायाच्या प्रेमळ नात्याचा हदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भाऊ कामाच्या जबाबदारीमुळे रिक्षा चालवताना आपल्यापाठी सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रिक्षा चालवत आहे. त्याच्यापाठी एक लहान बाळ झोपलेलं दिसतंय. यादरम्यान रोडवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्या व्यक्तीने लहान मुलाला पाठीमागे बसवण्याचेही कारण तरुणाला विचारले. तेव्हा तरुणाईने आपली आई बाहेर गेली असल्याने लहान बहिणीला सोबत आणल्याचे सांगितले. व्हिडीओ व्हायरल होताच सर्व माध्यमातून या भावाचे कौतूक होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ @help_by__god या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाही.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओला लाखोंचे व्हूव्ज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडीओ शेअर केला जातोय. यावर एका यूजरने म्हटलं आहे की,'खूपच छान आजच्या दिवसातील अप्रतिम व्हिडीओ'. तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे,' या भावासारखा भाऊ सगळ्यांना मिळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT