Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वासुदेवाच्या वेशभूषेत चिमुकल्याने जिंकली सर्वांची मने; विद्यार्थ्यांच्या अनोख्या सादरीकरणाचा VIDEO चर्चेत

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने सांता क्लॉज नाही तर वासुदेवाचे रुप धारण केले आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकलेली आहेत.

Tanvi Pol

School Student: येत्या एका दिवसावर नाताळ सण येऊन ठेपला आहे. पर देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा नाताळ सण आता भारतातही प्रत्येक शहरातही साजरा केला जातो. २५ डिसेंबरच्या अनेक दिवसापासून क्रिसमस सेलिब्रेशनचे वेध नागरिकांना लागलेले असतात. लहान मुलांमध्ये सांता क्लॉजचे मोठ्या प्रमाणात वेड आहे, परंतू अनेकदा महाराष्ट्रातील मुलांना आपल्या महाराष्ट्राचे खरेखुरे सांता क्लॉज म्हणजेच आपले वासुदेव माहिती नसल्याचे एका बाजूला म्हटले जाते.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून वासुदेव हरवत गेला आहे. आधीच्या काळी सकाळची सुरुवात वासुदेवाच्या गाण्याने होत असतं. मात्र आता अनेक मुलांना वासुदेव म्हणजे हे कोण माहिती नसते, पंरतू सोशल मीडियावर एका शाळेतील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात शाळेतील एका चिमुकल्याने शाळेत चक्क सांता क्लॉज (Santa Claus ) नाही तर चक्क वासुदेवाचे रुप धारण केले आहे. सध्या या चिमुकल्याच्या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला शाळेतील परिसर दिसत आहे. ज्या शाळेतील पटागंणात विद्यार्थी शिस्तीत बसलेले आहेत मात्र त्यावेळी शाळेच्या गेटमधून एक चिमुकला वासुदेवाची वेशभुषा धारण करुन एन्ट्री करतो. चिमुकल्याचा उत्साह पाहून तिथे असलेला प्रत्येकजण टाळ्या वाजवत चिमुकल्याचा उत्साह वाढत आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये पसंतीस ठरत आहे.

चिमुकल्याचा व्हिडिओ दोन दिवसापासून 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ प्रत्येकाला ''sanjay.mali.5249'' या अकाउंटवर पाहता येईल. दोन दिवसात व्हिडिओला ८१ हजारहून नेटकऱ्यांनी लाईक्स केले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने चिमुकल्याचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT