Student Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: शाब्बास पठ्ठ्यानो! चिमुकल्यांची इंग्लिश ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल; VIDEO एकदा पहाच

Student Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांच भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर शाळेतील चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लहान चिमुकले उत्तम इंग्रजी बोलताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Little Student Viral Video

सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ पाहून डोळ्यांत पाणी येत तर कधी पोट धरून हसण्यास भाग पाडतात. अशातच सोशल मीडियावर शाळेतील चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लहान चिमुकले उत्तम इंग्रजी बोलताना दिसत आहेत.

गुरु हा प्रत्येक माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा असतो. सर्वांच्या मनात शिक्षकांचे आदराचे स्थान असते. शिक्षकांनी आपल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली आहे.

तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि कठीण परिस्थितीचा सामना करायला शिकवतात. या व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच या चिमुकल्यांना लहान वयातच उत्तम इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा आदर वाटेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकतो की, यात शाळेतील वर्गात काही लहान विद्यार्थी बसलेले आहेत. प्रत्येकाने लाल रंगाचा जॅकेट परीधान केलेला आहे. बेंचवर बसलेल्या त्यांच्या समोर विविध भाज्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षिका प्रत्येकाला त्यांच्या समोर असलेल्या भाजी विषयी इंग्रजीमधून विचारत आहे,तेव्हा विद्यार्थीही भाज्याची नावे अचूकपणे इंग्रजीमधून देत आहे.

व्हायरल व्हिडिओ नागालैंडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी त्यांच्या एक्स ( ट्वीटर) वरील @AlongImna या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलंय की,हर स्कूल में ऐसी शिक्षा व्यवस्था होनी चाहिए और हर शिक्षक ऐसा! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तूफान व्हायरल झाला आहे. तसेच हजारोच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळालेत आणि व्हिडिओवर शिक्षक तसेच चिमुकल्यांवर कौतूकांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT