Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

भरवर्गात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज; मुलीची रिअ‍ॅक्शन एकदा पाहाच; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ प्रेमवीरांचे असतात. जे पार्टनरला प्रपोज करण्यासाठी अनेक आयडिया वापरतात. असाच एका शाळेतील मुलाने भर वर्गात आपल्या गर्लफॅेंडला प्रपोज केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Boy Purpose A Girl In School Viral Video:

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा अड्डा असे म्हणायला हरकत नाही.सोशल मीडियावर भांडणाचे, प्रँकचे तर प्रेमवीरांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी दिल्ली मेट्रोतील भांडण पाहायला मिळतात तर कधी प्रेमवीर आपल्या पार्टनरसाठी काहीही करतात, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच एक शाळेतील मुलांचा प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एका मुलाने चक्क शाळेतच आपले प्रेम व्यक्त केले आहे. गुडघ्यावर बसून त्याने आपल्या पार्टनरला प्रपोज केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेतील एका वर्गात या मुलाने मुलीला प्रपोज केले आहे. हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत वर्गात एका मुलाने मुलीला प्रपोज केल्याचे दिसत आहे. गुडघ्यावर बसून मुलीला फूलांचा गुच्छ देत त्याने प्रपोज केलं आहे. वर्गात इतर विद्यार्थीदेखील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या समोर प्रपोज केले आहे. यामुळे ती मुलगी लाजताना दिसत आहे. मुलगी त्या मुलाला उभ राहण्यास सांगते. त्यानंतर त्याच्याकडून फुलांचा गुच्छ घेते. मुलगा तिला चॉक्लेट्स आणि एक गिफ्ट देतो. त्यावेळी मुलीला काय रिअॅक्शन द्यावी हे समजतच नव्हते. ती पूर्णवेळ लाजतानाच दिसत आहे. हा व्हिडिओ शाळेतील इतर मुलांनी रेकॉर्ड केला आहे.

itz__aa_raja_kumar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'शाळेच्या दिवसांची आठवण झाली' 'शाळेतील हे दिवस सुंदर होते.' असे अनेक युजर्संनी म्हटले आहे. तर अनेकांनी 'आजकालच्या मुलांना शिस्त नाही'. 'भर वर्गात हा काय प्रकार सुरू आहे'. असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT