Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रोहित शर्माने हृदय जिंकलं! रस्त्यात कार थांबवून तरुणीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; VIDEO तुफान व्हायरल

Rohit Sharma Viral Video: सोशल मीडियावर सध्या रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो मुंबईत दिसून आलेला आहे.

Tanvi Pol

Rohit Sharma Viral Video: आपल्या भारतात मोठ्या संख्येने क्रिकेट या खेळाचा चाहता वर्ग आहे. आजपर्यंत अनेक स्टार खेळाडू भारताला मिळाले आहेत. मात्र क्रिकेटचे वेड काही जनतेच्या मनातून कमी होत नाही. भारतीय क्रिकेट संघांतील प्रत्येक खेळाडूचा वेगळा असा फॅन बेस आहे. मग कोणी रोहित शर्मा फॅन आहेत तर कोणी धोनीचे. हे स्टार खेळाडू जेव्हा चाहत्यांना कुठेही दिसून येतात तेव्हा फोटो काढण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अत्यंत उत्साही झालेले आपण पाहत असतो. अनेकदा आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काही चाहते कोणत्याही थराला जाताना आपण पाहिली आहेत. सोशल मीडियावर या संबंधित व्हिडिओही पाहण्यासाठी मिळाली आहेत. सध्या याच क्रिकेटरपैंकी एकाचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात भारतीय क्रिकेट संघांतील रोहित शर्माने मुंबईवारी केलेली आहे. ज्यात त्याने एका तरुणीला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ रोहित शर्मा आणि त्याच्या एका फॅनचा आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma)जेव्हा मुंबईतील रस्त्यावर कारने प्रवास करत होता. तेव्हा एका तरुणीला त्याने वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या. चक्क रोहित शर्माने शुभेच्या भेटल्यानंतर तरुणी अत्यंत आनंदी झाली होती. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आला असून प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला रोहित शर्मा एका आलिशान स्पोर्ट्स कारमधून मुंबईच्या रस्त्यावरुन जात असतो. दरम्यान रोहित शर्माला पाहून अनेक चाहते त्याला पाहण्यासाठी थांबतात. चाहत्यांना पाहून रोहित शर्माने कार थांबवली आणि कारच्या काचाही खाली घेतल्या.

व्हिडिओत पुढे तुम्हाला दिसेल की, रोहित शर्मा जेव्हा चाहत्यांना भेटून काच बंद करणाक असतो, त्या दरम्यान तेथिल एक व्यक्ती रोहित शर्माला पाहतो आणि म्हणतो की,''सर तिचा वाढदिवस आहे आज'' रोहित शर्माच्या बाजूला एक तरुणी असते तिच्या बद्दल तो व्यक्ती सांगत असतो. काही वेळातच रोहित शर्मा आनंदाने वाढदिवस असलेल्या तरुणीला वाढदिवसाच्या शुभेच्या देतो. तरुणीला हात मिळवून तो शुभेच्छा देताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तरुणीसोबत फोटो काढतो आणि तेथून तो कारमधून जाताना व्हिडिओत दिसत आहे.

रोहित शर्माचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@rushiii_12'' या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' कर्णधार रोहित शर्मा आज मुंबईच्या रस्त्यांवर दिसला.मग तो एका गोंडस फॅनशीला भेटला जिचा वाढदिवस होता आणि रोहितने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या'' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला असल्याने नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हा आमचा खरा हिरो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''विराट कोहली आज दिसला नाही'' तर अशा अनेक यूजर्संनी आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याच्या अशा वागण्याचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT