Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पुण्यात धावत्या बसमध्ये तुफान राडा, बसचालक अन् प्रवाशामध्ये सिनेस्टाईल हाणामारी; धक्कादायक VIDEO

Viral Video : पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि एका प्रवाशामध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यातील जास्त व्हिडिओ हे बसमधील असतात त्यात कधी चक्की बस चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचे असतात. सध्या सोशल मीडियावर बसमधील बसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ फक्त प्रवाशांचा नसून बस चालक आणि एका प्रवाशाचा आहे. यात चक्क बस चालक आणि एका प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी होताना दिसत आहे.

सध्या बसमधी बस(Bus) चालक आणि प्रवाशामध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संपूर्ण व्हिडिओ हा पुण्यातील पीएमपीएल बसमधील आहे. याआधी सोशल मीडियावर पुणे शहरातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पीएमपीएल बस चालकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. चालकही त्याला पकडतो आणि जोरात हाणामारील सुरुवात करतो. यात त्या व्यक्तीच्या अंगावर असलेले कपडेही राहात नाहीत. चालक स्वत:चा बचाव करताना त्या व्यक्तीची अंगावरचे कपडे फाटतात. मग काय संतप्त झालेली ती व्यक्ती चालकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. यात बसमधील एकबी व्यक्ती हे भांडण सोडवण्याचा जराही प्रयत्न करताना दिसत नाही. परंतू संपूर्ण हाणामारी प्रकार बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

पुण्यातील व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवरील@saamtvnews या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गातून करण्यात येत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'स चे चालक हे दोनीही खुप वाकड बोलतात …..या भाऊला १०१ तोफांची सलामी '.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव; नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स तोडले| Video

Heatwave In Nagpur: नवतपात सूर्याचा कहर, नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

SCROLL FOR NEXT