Mumbai Local Train: सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. लहान मुल असो वा मोठ्यांमध्ये ही दिवाळीचा उत्साह आपल्याला दिसून येतो. त्या संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठीही मिळतात. मात्र त्यात सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क प्रवाशांनी लोकल ट्रेनमध्ये दिवाळी साजरी केलेली आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओचा प्रचंड चर्चा होत असून व्हिडिओ जास्तीत जास्त अनेकांना शेअर केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन(Train) दिसत असून कोणत्या तरी स्टेशनवर ट्रेनमध्ये अनेक प्रवाशी चढताना दिसून येत आहेत. व्हिडिओत पुढे तुम्हाला लोकल ट्रेनमधील पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे. ज्यात मोठ्या संख्येने पुरुष प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र पुढे पाहिले तर काही प्रवासी आहेत जे एकत्र जमून दिवाळीचा फराळ आणि काही खावू एका प्लेटमध्ये भरत अनेकांना देत आहे. व्हिडिओच्या शेवटी समजते की सर्व लोकल ट्रेनमध्ये जमेल तशी दिवाळी(Diwali) साजरी करत आहे.
मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@borivali_churchgate_bhajan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''मुंबई लोकल ट्रेन मधील दिवाळी…'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला असून व्हिडिओला अनेक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खुप छान'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आमच्या ग्रुपची आठवण आली त्या दिवसांची'' तर अनेकांनी प्रतिक्रियांमध्येच दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.