Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आरारा खतरनाक...आजोबांनी घेतला आजींसाठी भन्नाट उखाणा; VIDEO एकदा बघाच

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका वयोरुद्ध जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आजोबांनी आजीसाठी एक सुंदर उखाणा घेतलेला आहे. तुम्हीही एकदा उखाणा ऐका.

Tanvi Pol

Old Couple Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम बरेच व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी तरुण-तरुणींच्या स्टंटबाजीचे तर कधी हाणामारीचे असतात. अनेकदा व्हायरल व्हिडिओ हे नात्यातील गोडवा दाखवणाऱ्या क्षणांचे असतात, त्यात सध्या एका वयोरुद्ध जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क आजोबांना आपल्या बायकोसाठी सुंदर असा उखाणा घेतला आहे.

लग्न (Weeding)असो वा कोणताही शुभ कार्यक्रम महिला वर्गात उखाणा घेतला जातो. मग जर लग्न कार्य असल्यास नवरी असो वा नवरदेव अशा दोघांना उखाणे घेण्यास सांगितले जाते. त्यातही अनेकांना जबरदस्ती उखाणे घेण्यास सांगतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या आजोबांनी जो आजीसाठी उखाणा घेतला आहे तो सध्या प्रत्येक नेटकरी वर्गाच्या पसंतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आहे जो एका वयोरुद्ध व्यक्तींशी संवाद साधत आहे. त्यात तो सुरुवातीस आजीशी संवाद साधत असत त्यानंतर त्यांच्याशी बोलता बोलता तो व्यक्ती आजोबांना आजीसाठी एक उखाणा घेण्यास सांगतो तेव्हा आजोबा ''तुपात तूप गायीचे...सोजरीच्या वेणीला फुल जाईच''असा एक सुंदर उखाणा घेतात. 

सध्या आजी आजोबांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''sursangam_latur'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ इतका व्हायरल झाला की नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''निखळ झर्यातील नितळ पाण्यासारखे आयुष्य जगलेली माणसं'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'',अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

SCROLL FOR NEXT