Jugad Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: चपात्या बनवण्याची निंजा टेक्निक; महिलेचा १६ सेकंदाचा व्हिडीओ घराघरात नक्कीच पोहोचणार

Jugad Viral Video: चक्क तिने एका वेळेत जास्त चपाती बनवण्याचा देशी जुगाड केला आहे. व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ninja Technique Of Making Chapattis

प्रत्येक महिलेचा बरासचा वेळ स्वयंपाक घरात जातो तसेच स्वयंपाक करणे अनेकांना कटाळंवाणे काम वाटते. स्वयंपाक घरातील काम सोपे करण्यासाठी अनेक स्त्रीया विविध ट्रीक वापरत असतात,ज्यामुळे जेवण बनवणे अगदी सोपे होते. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क तिने एका वेळेत जास्त चपाती बनवण्याचा देशी जुगाड केला आहे. व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

स्वयंपाक घरातील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका गुलाबी रंगाच्या साडीत एक महिला स्वयंपाक घरात दिसत आहे. महिलेचे समोरील किचन ओट्यावर पीठाचे पाच गोळे आहेत. सुरुवातीस महिलेने एका पीठाच्या गोळ्यावर इतर उरलेले पीठाचे गोळे ठेवले. त्यानंतर एक साथ तिने ते लाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाचवेळी लाटल्यानंतर साधारण पाच चपात्या एकाचवेळी झाल्या. महिलेने केलेला हा जुगाड नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @Shweta5_या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे तसेच व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये'ये आइडिया हमारे देश से बाहर नहीं जाना चाहिए' असे लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर असा जुगाड पहिल्यांदा पाहायला मिळत आहे.

व्हिडिओ शेअर होतास मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. महिलेच्या व्हिडिओला नेटकऱ्यांचे हजारो व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत. या भन्नाट जुगाडू आयडियाला यूजर्संच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यातील एका यूजरने लिहिले की,गजब' तर आणखी एका यूजरने लिहिले'बहुत सुंदर बेटा'अशा विविध गमतीदार आणि महिलेचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT