Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनीही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Mumbai Local Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काही पुरुष प्रवाशांचा लोकलमध्ये डान्स रंगला आहे.

Tanvi Pol

Dance Video: सोशल मीडियावर तुम्हाला कायम मुंबई लोकलमधील व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी आहे मात्र गेल्या काही वर्षात लोकलमध्ये अनेक वादविवाद पाहण्यासाठी मिळताता आणि त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनचा व्हायरल होत आहे. मात्र ज्यात महिला प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ नाही तर पुरुश प्रवाशांच्या डान्सचा व्हिडिओ आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत मुंबई लोकल दिसत असून त्यातही मुंबई लोकलमधील पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे. ज्यात पुरुष प्रवाशांची मोठी गर्दी आहे, अशातच या कंपार्टमेंटमध्ये काही पुरुष आहेत ज्यातील एक व्यक्ती गाणी म्हणत आहेत आणि काही व्यक्ती डान्स करण्याचा आनंद घेत आहे. मात्र या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर त्या व्यक्तींमध्ये एक वयोरुद्ध आजोबाही आहेत जे ''काटा लगा'' या गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance)करताना दिसून येत आहेत. सर्व मोहाळचा व्हिडिओ त्यातील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.

लोकलमधील डान्स व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@Mumbaikhabar9'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर यापूर्वी मुंबई लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेकांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात'' तर अनेकांनीही अशात काही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT