Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: कृष्णा नदीपात्रात भल्यामोठ्या मगरीचे दर्शन! नागरिकांनी व्हिडिओ केला शूट

Viral Video: मिरजेत कृष्णा घाट या ठिकाणी भल्या मोठ्या मगरीचे दर्शन‌ घडून‌ आले आहे.कृष्णा नदीच्या पात्रात आज भली मोठी मगर ही निंवात पाण्यात पोहत होती.

Tanvi Pol

Sangli : सोशल मीडियावर कायमच देशातील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायलरल होत असतात. अशातच सध्या महाराष्ट्रातील मिरज येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे कृष्णा घाट या ठिकाणी भल्या मोठ्या मगरीचे दर्शन‌ घडून‌ आले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असून सध्या नदीकाठच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला नदीच्या पात्रात एक भली मोठी मगर दिसत आहे. जर व्हिडिओ नीट पाहिला तर खरंच मगर(Crocodiles) अतिशय लांब लचक अशी मोठी आहे. सकाळी सकाळी मगर पाण्यात दिसल्याने नागरिकांनी कृष्णा नदीच्या पुलावर गर्दी केली होती.तर काही नागरिकांनी मगरीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले आहे. मगरीचे चित्रण करुन व्हिडिओ व्हायरल‌ झाला असून नदीकाठच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ''saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला असून अन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

माणगावच्या काळ नदीपात्रात महाकाय मगरींचा वावर

माणगावच्या काळ नदी पात्रात महाकाय मगरींचे दर्शन होत आहे. अनेक मगरी दुपारच्या सुमारास खडकावर येऊन सूर्यस्नान घेत असतात. या नदीचा वापर मासे पकडणे आणि कपडे धुण्यासाठी केला जातो. नदीतील मगरींच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने या मगरींचे चित्रीकरण केलंय.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT