Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कसं हाय! ढोल नव्हे तर ताशावर धरला ठेका; तायडीचा पुष्पा स्टाईल जोश पाहून व्हाल अवाक्

Viral Video: सोशल मीडियावर एका चिमुकलीचा ढोल-ताशा पथकातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिचा ताशा वाजवण्याचा उत्साह पाहून सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रासह सर्वत्र गणेशोस्तवचा माहोल आहे. मात्र सध्या दीड दिवसांच्या गणपती विसर्जनापासून सात दिवसांच्या गणराच्या विसर्जन सुरु झाले आहे. विसर्जनाच्या वेळी अनेक मोठ-मोठे ढोल पथक आपल्याला दिसून येतात. ढोल पथकातील प्रत्येक तरुणांचा उत्साह काहीसा निराळा असतो. सोशल मीडियावर आपल्याला अनेक विसर्जनाचे व्हिडिओ पाहायला मिळाले आहेत, त्यामध्ये अनेक ढोल पथकही दिसून येत येतात. सध्या अशाच एका ढोल पथकातील एका चिमुकल्या ताईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चिमुकलीचा उत्साह तरुणांना फिका पडेल असा आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र व्हायरल होतच अससेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, गणेशोस्तावाचे (Ganpati Festival )वातावरण दिसून येत आहेत. याच माहोलमध्ये तुम्हाला एक ढोल-ताशा पथकातील काही सदस्य दिसून येत असतील. यात तरुणीपासून तर तरुणापर्यत शिवाय शाळेतील (School) मुलींही दिसून येत आहेत.

यातच एक चिमुकली (Little Girl)आहे, जीच्या हातात एक ताशा दिसून येत आहे. मात्र ताशा वाजवताना तिचा आनंद आणि उत्साह प्रचंड भारी आहे. एका बाजूला ताशा (Tasha) वाजवण्याकडे लक्ष तर त्याच बरोबरीने पुष्पा स्टाईलचे डान्स. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''swayambhu_dhol_tasha__pathak'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला असून दोन दिवसांतच तब्बल ९ हजारांच्या घरात व्हिडिओला पसंती मिळाली असून लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ (Video) पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''विषय हार्ड'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच'' तर बाकीच्या यूजर्संनी चिमुकल्या उत्साहाचे कौतूक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT