Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हळदी समारंभात नवरीचा जलवा; 'पुष्पा' गाण्यावर केला जबराट डान्स

Haldi bride dance: सोशल मीडियावर सध्या एका हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण नवरीच्या उत्साहाच्या कौतुक करत आहे.

Tanvi Pol

Viral Wedding Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हळदीच्या समारंभातील एक भन्नाट क्षण व्हिडिओत कैद झाला आहे. ज्यामध्ये नवरीने 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटातील गाजलेलं गाण्यावर इतक्या जोशात डान्स केला आहे की, पाहणाऱ्यांची नजर हटता हटत नव्हती. या व्हिडिओमुळे नवरी सोशल मीडियावर स्टार झाली आहे आणि नेटकरी तिच्या आत्मविश्वासाचं भरभरून कौतुक करत आहेत.

नवरीचा अंदाज पाहून सगळे थक्क

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला हळदीचा (Haldi Program)कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने कुटुंबातील सर्वजण आणि नवरा-नवरी मांडवात आहेत. त्याच वेळी पुष्पा २ या चित्रपटातील गाणं लागतं. मग काय नवरीबाई थेट सर्वांसमोर डान्स करण्यास सुरुवात करते. त्यावर ती थांबत नाही तर तिच्या सोबत नवरदेवालाही डान्स करण्यास भाग पाडते. सध्या या व्हिडिओला सर्व नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

नवरीच्या स्टेप्सना भरभरून दाद

हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक, युट्युब अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र तो तुम्हाला आता एक्सवरील @allubabloo या अकाउंटवर पाहता येईल. डान्स पाहिल्यानंतर व्हिडिओला लोकांनी लाखो लाईक्स दिले आहेत शिवाय अनेक व्ह्यूज मिळवून हा व्हिडिओ टॉप ट्रेंडिंगवर व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

नवरीचा डान्सचा (Dance) उत्साह पाहिल्यानंतर आणि डान्स करताना तिच्या जोडी दाराने तिला दिलेली साथ नेटकऱ्यांनी अत्यंत आवडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''जोडीदार मनासारखा मिळण्याचा हा आनंद'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्कीच सासर गाजवणार'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT