Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दहावीत काठावर पास, तरीही दिवस खास; दोस्तांनी केक कापला; व्हिडिओ व्हायरल

Nandurbar Viral Video: गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले. सध्याही दहावीच्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात नेमके काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Celebrated Success: नुकताच दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला, त्यात कोणी पास झालं तर कोणी नापास झालं आहे. मात्र, नंदूरबार जिल्ह्यात धडगाव शहरात राहणाऱ्या कार्तिक साठे हा तरुण एकदम काठावर पास झालं आहे. तरी देखील कार्तिकच्या मित्रांनी पास झाल्याचा आनंदात केक कापून जल्लोष केला आहे.

कार्तिकला ४ विषयात 35 गुण आहेत आहेत, तर उर्वरित इंग्लशीमध्ये ३८ आणि सोशल सायन्स मध्ये ४९ गुण मिळून हा पट्ट्या ३८.४० टक्क्यांनी पास झाला आहे. काठावर पास झाला, म्हणून कार्तिकच्या मित्रांनी पास झाल्याचा आनंदात केक कापून जल्लोष केला आहे. काठावर का होईना पण पास झालो ना हे म्हणत कार्तिकने केक कापत आनंद व्यक्त केला आहे

कार्तिक साठे हा व्हिडिओ सध्या समाज्य माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यात तो अनेकांच्या पसंतील आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. ऐवढेच नाही तर हा व्हिडिओ अनेक पालकवर्ग फेसबूक, ट्वीटर(एक्स) आणि अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर(Media) क्वचित असे काही व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. त्यामुळे नेटकरी वर्गात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटलं,''विद्यार्थ्यांना अशा पाठींब्याची खरचं गरज आहे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''खरे मित्र भेटले की कोणत्या गोष्टीची काळजी राहत नाही'' अशा प्रकारे अनेकांनी मजेशीर देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीप: या विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT