Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वयाच्या सत्तरीत आजींची कमाल! 'बुगडी माझी सांडली गं' गाण्यावर धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी घायाळ

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी मराठी गाण्यावर धम्माकेदार डान्स केलेला आहे.

Tanvi Pol

Old Women Dance Video: सोशल मीडियावर आपण रोज अनेक व्हिडिओ पाहत असतो. मग कधी थराराक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी भावूक करणारे. मात्र जास्तीत जास्त व्हिडिओ वयोरुद्ध आजींचे आणि आजोबांचे डान्स करणारे असतात. सध्या असाच एका आजींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आजींनी धम्माकेदार डान्स सादर केलेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एक आजी दिसून येत आहे. आजी जिथे उभे आहेत त्याच्या आजूबाजला जो परिसर आहे सर्व तो गणेशोत्सवाचा आहे. आजींच्या पाठी मागे एक गणपती मंडप आहे. मात्र त्यानंतर आजी डान्स करताना दिसून येत आहेत. आजींचा डान्स व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने(Video) कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

आजींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील '@shri_ganeshpark'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ गणपती उत्सावातीस असल्याचे दिसत आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७२ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले असून अजूनही मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत

आजींचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला असून अनेक प्रतिक्रिया आजींचा डान्स पाहून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''देवबाप्पा समोर आनंद कधीच कुणाचा लपून राहिला नाही आजीने आज सिद्ध केला की आनंदाला वय नसतं'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''ए आज्जी काय बोलायचे गं तुझ्या या एनर्जीला..किती सुरेख आणि भावपूर्ण आहे तुझी ही लावणी..गिरकी पण अशी लयबद्ध आहे की कुठेच तोल नाही गेला आणि वयाने म्हणशील तर तू आहेसच गं फक्त वयवर्षे १६'' अशा अनेक आजींचे कौतुक अनेकांनी केलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT