Viral Video Of Times Square Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'तुझ में रब दिखता है...' प्रेयसीसाठी प्रियकराने Times Square वर केलं किंग खान स्टाईलने प्रपोज

Viral News: आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेकजण काही न काही वेगळं करत असतात. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोज करतात. असंच एका प्रियकराने प्रेयसीसाठी टाईम्स स्केअरवर किंग खान स्टाईलने प्रपोज केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Boyfriend Purposes Girlfriend At Times Square:

सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अनेकांना आपले लग्न सगळ्यात वेगळे असावे असे वाटते. त्यासाठी जोडीदार सरप्राईज देतात आणि काहीतरी युनिक गोष्टी करु पाहतात. काहीजण भर रसत्यात प्रपोज करतात, तर कोणी संपूर्ण हॉटेल बूक करतात. अशाच एका प्रियकारने आपल्या प्रेयसीला बॉलिवूडचा किंग खानच्या स्टाईलमध्ये प्रपोज केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा किंग खान हा रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याच्यासारखं प्रेम करणार पार्टनर मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. अनेकजण यासाठी प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न एका प्रियकराने केला आहे. एका प्रियकराने टाईम्स स्केअरच्या रस्त्यावर प्रेयसीला किंग खान स्टाईल प्रपोज केलं आहे. किंग खानच्या गाण्यावर नाचत प्रेयसीला लग्नाची मागणी घातली आहे.

बॉलिवूडचा 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातील 'तुझ मे रब दिखता है' या गाण्यावर डान्स केला आहे. चित्रपटात जसे शाहरुख खानने काहीजणांच्या साहाय्याने अनुष्का शर्माचे पोस्टर तयार केलं होतं. तसंच या प्रियकराने प्रेयसीसाठी टाइम्स स्केअरवर पोस्टर तयार केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर ताल धरला होता. प्रियकराने मित्राच्या साहाय्याने हे अनोख प्रपोज केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

छवी आणि पवन असे या जोडप्याचे नाव आहे. या दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पवनने छवीला टाईम्स स्केअरवर आपले फोटो लावत माझ्याशी लग्न करशील का? असं विचारत हटके प्रपोज केलं आहे. त्याच्या या प्रपोजचं नेटकऱ्यांनी मात्र खूप कौतुक केलं आहे.

@chhaviverg या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या प्रपोजनंतर पवनने छवीच्या हातात अंगठी घातली. अगदी स्वप्नवत प्रपोज केल्यासारखं वाटत असल्याचे छवीने आपल्या पोस्टमधून सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT