Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: डान्स क्वीन नवरी! 'कर मन्ह लगण' गाण्यावर केला भन्नाट डान्स; जबरदस्त परफॉर्मन्सने नेटकरी थक्क

Bride Dance: सध्या सोशल मीडियावर नव्या नवरी बाईचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे शिवाय अनेकजण नवरीचे कौतुक करत आहेत.

Tanvi Pol

Wedding Performance Video: नव्या नवरीने खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स करत लग्न सोहळ्यात रंगत आणली आहे. नवरीच्या एनर्जेटिक स्टेप्स आणि आम्तविश्वासाने वऱ्हाड्यांची मने जिंकली. सध्या हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी वर्गातून तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक करत आहेत. तुम्ही हा धमाकेदार व्हिडिओ पाहिला का?

नवरीचा धमाकेदार डान्स

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक नवरी (Bride) लग्नाच्या मांडवात जोरदार डान्स करत असताना दिसतेय. विशेष म्हणजे, ती कर मन् लगण या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त ठेका धरत आहे. डान्स करत असताना सर्व स्टेप्स ती तिच्या आईकडे पाहत करत आहे. नवरीच्या एनर्जेटिक स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स आणि कॉन्फिडन्स पाहून मांडवातील प्रत्येकजण थक्क झाला आहे.

स्वत:च्या लग्नात नवरीचा डान्स पाहून कुटुंबियातील प्रत्येकजण भारावून गेले आहे. तिच्या मैत्रिणी आणि बहिणी डान्स पाहून खुश झालेल्या दिसत आहेत शिवाय त्या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकजण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत जल्लोषाचे वातावरण निर्माण करत आहेत.

सध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील __.snehaaaa._या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, फेसबुक आणि यूट्युबवरही हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत. प्रत्येक यूजर्संनी नवरीचा आनंद आणि आत्मविश्वासाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केलेले आहेत.

टीप: हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT