Couple fight viral SAAM TV
व्हायरल न्यूज

VIRAL VIDEO : बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं; गर्लफ्रेंड संतापली, भररस्त्यात ऊरावर बसून बुक्क्यांनी हाणलं

Couple fight viral: सोशल मीडियावर एका कपलचा वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चीटिंगच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या या वादामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ खरा की बनावट याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे कोणतीही घटना घडली की ती क्षणात रेकॉर्ड करता येते. अशामुळे अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका 10 सेकंदांच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुण-तरुणीमधील वादाचं दृश्य दिसत असून त्यामागे चीट केला असल्याचा दावा करण्यात आलाय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्हिव्ज आले आहे. व्हिडिओ छोटा असला तरी त्यातील घटना आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओमध्ये एक तरुण जमिनीवर पडलेला दिसतो तर एक तरुणी त्याचे हात पकडून त्याच्यावर जोरजोरात ओरडताना आणि मारताना दिसते. काही क्षणांनंतर दोघांमध्ये झटापट होत असल्याचंही पाहायला मिळतंय.

व्हिडिओच्या शेवटी नेमकं काय घडलं, हे स्पष्ट होत नाही. मात्र या व्हिडिओसोबत असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पकडल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, आमच्या मुली काही कमी नाहीत. तर दुसऱ्याने म्हटले, मुलीने मुलाला चांगलाच धडा शिकवला. दरम्यान या युजर्सने मात्र या घटनेवर टीका करत, अशा वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक ठिकाणी का घडतात? असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान हा व्हिडीओ किती खरा आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र तरीही तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT