Mumbai Rain Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Rain Viral Video: पाण्यातून रेल्वेचा प्रवास! चुन्नाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पुरासारखं पाणी साचलं; VIDEO पाहाच

Mumbai Rain Alert: राज्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोक सेवेवर झाला आहे. मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. चुन्नभट्टी रेल्वे स्थानक परिसरातील पावसाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत होणाऱ्या पावसामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी- सकाळी रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येत नाहीये. रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्यामुळे रेल्वे उशिराने सुरु आहे. काही ठिकाणी रेल्वे २ नंबर प्लॅटफॉर्मवरुन ४ नंबर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ होत आहे. मध्य रेल्वे, हार्बर लाइन आणि पश्चिम रेल्वे अशा सर्व रेल्वे मार्गांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रेल्वेतून प्रवास करताना आजूबाजूला पाणी साचले आहे. याचेच अनेक व्हिडिओ सध्या समोर आले आहेत.

चुन्नाभट्टी रेल्वे स्टेशन परिसारत प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. हार्बर लाइनची सेवा १०-१५ मिनिटे उशीराने आहे. रेल्वेच्या परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेतून बाहेर पाहिल्यावर पूरसदृश्य परिस्थिती दिसत आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चुन्नाभट्टीकडून जाणाऱ्या ट्रेनमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यात ट्रेनमधून बाहेर पाहिल्यावर प्रचंड पाणी साचल्याने दिसत आहे.खाली रेल्वे रुळ दिसत नाहीये. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. याच पाण्यातून रेल्वेचा प्रवास केला जात आहे. हे पाणी पाहून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे वाटत आहे.

चुनाभट्टी, मीठी नदीच्या परिसरात तब्बल २०० मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मीठी नदीची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे मात्र, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT