Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! गाडी चालवताना फोनवर बोलणं पडलं महागात; घटनेचा CCTV FOOTAGE आला समोर

Accident Viral Video: सोशल मीडियावर अपघांताचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज कायमच व्हायरल होत असतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Police Viral Video

सोशल मीडियावर अपघांताचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज कायमच व्हायरल होत असतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. बहुतेकदा निष्काळजीपणा अपघाताचे मुख्य कारण असते. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओत मोबाईलवर बोलण्याच्या नादात एका महिलेचा थोडक्यात जीव बचावल्याचे समोर आले आहे.

कायम वाहतुक पोलिसांकडून सुचना मिळते गाडी चालवताना मोबाईलचा वापर करु नये. तरीही काही मंडळी असतात जी सुचनांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यात त्यांचा जीव जातो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्कुटीवरुन जातेय. दरम्यान तिला एक कॉल येतो ती तशीच धावत्या स्कुटीला एका हाताने थांबवण्याचा प्रयत्नात स्कुटीचा पटकन ब्रेक दाबते. यानंतर ती कॉलवर बोलत असताना स्कुटीवरचे नियंत्रण सुटते आणि रस्त्यावर धावत सुटते. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा स्कुटीवरचे तिचे नियंत्रण सुटते तेव्हा समोरुन एक ट्रक येतो. नशिब बलवत्तर म्हणून ट्रकच्या खाली येण्यापासून महिला बचावली.

सोशल मीडिया एक्स अॅपवरील (ट्वीटर)@DelhiPolice या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटस् केल्यात. व्हिडिओला लाखोच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत तर लाईक्सही येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT