Chhatrapati Sambhaji Nagar: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना लगाम; मुख्य चौकात वाहनांवर १५२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

CCTV Cameras to Avoid Traffic Jams: छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक कोंडी असणाऱ्या महत्त्वाच्या चौकात 152 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चांगलाच लगाम लागणार
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji NagarSaam TV
Published On

Traffic Jams in Chhatrapati Sambhaji Nagar:

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवतात. अनेक नागरिक वाहतुकीचे नियम सर्रास मोडतात. सिग्नल असूनही वाहने पुढे नेतात. असे केल्याने अपघातांसह वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना लगाम लागणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhatrapati Sambhaji Nagar
Sangli Crime: मिरजमध्ये धाडसी चोरी, छताचा पत्रा कापून सराफ दुकान फोडले; लाखोंचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक कोंडी असणाऱ्या महत्त्वाच्या चौकात 152 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चांगलाच लगाम लागणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे वाहनांचा नंबर टिपून वाहन मालकांना ऑनलाइन चलन पाठवण्यास सुरुवात होणार असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत सांगण्यात आलंय.

शहरातील 17 महत्त्वाच्या चौकात हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहर पोलीस आणि स्मार्ट सिटी तर्फे हे कॅमेरे बसविण्यात येणार असून लवकरच याचे उद्घाटन होईल. कॅमेरे बसवल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ज्या व्यक्ती वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्या वाहनाचा फोटो काढला जाणार आहे. तसेच त्यांना रस्त्यावर किंवा थेट ऑनलाईन पद्धतीने दंड भरावा लागणार आहे.

नाताळची सुट्टी वाहतूक कोंडीत गेली

नाताळ सणानिमित्त शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने अनेकजण घराबाहेर पडलेत. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून मुंबई-पुणे मार्गावर 24 तासांपेक्षा अधीक काळ ट्रॅफिक जाम असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. तसेच खालापुर, खोपोलीपासून पुढे घाट रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बोरघाटातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Chhatrapati Sambhaji Nagar
Viral Video: शॉर्ट ड्रेसवरुन नवरा-बायकोमध्ये वाद, नवऱ्यांची नेमकी अडचण काय होती? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com