Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा अजब कारनामा; व्हायरल VIDEO पाहून नेटकऱ्यांचा चढला पारा

Shocking Video: सध्या एका तरुणाच्या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पहा.

Tanvi Pol

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर अनेकदा तरुणांच्या स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंटबाजी करताना अनेक तरुणांच्या जीव गमवावा लागला आहे तर अनेकदा शरीराचे नुकसान ही झालेले आहे मात्र व्हायरल व्हिडिओ पाहूनही पुन्हा एकदा धोकादायक स्टंटबाजी सुरु असते, त्यात सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने चक्क स्विमिंग पुलमध्ये जिवघेणी मस्ती केलेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला स्विमिंग पुल दिसत आहे. या स्विमिंग पुलमध्ये अनेक नागरिक पाण्यात खेळण्याच्या आनंद लुटत आहे तर काहीजण स्लाईडवरुन खाली येत आहे,अशातच एक तरुण आहे जो स्विमिंग पुलमध्ये साईल्टवरुन येणाऱ्या दिशेने थांबलेला आहे ज्या क्षणी स्लाईडवरुन कोणी खाली येत असते त्या क्षणी जो बाजूला होत आहे. तरुणाची ही धोकादायक मस्ती सुरुच असते मात्र यात जर वरुन जोरदार वेगात येणाऱ्या व्यक्तीची धडक तरुणाला बसली असती तर तरुणाला गंभीर दुखापत झाली असती हे नक्की. सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने मोबाईलध्ये कैद केलेला आहे.

तरुणाचा व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल झालेला असून तो व्हिडिओ तुम्हाला ''memer.freak'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट झालेला असून आतापर्यंत ५० हजारच्या आसपास लाईक्स व्हिडिओला मिळाले असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

लाईक्स व्हिडिओला मिळतच आहे मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''फक्त रिल्ससाठी हा प्रकार'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नको ती मस्ती कशासाठी'', तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT