Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Aeroplane Viral Video: झोप महत्वाची! विमानात झोपण्यासाठी आजीबाईंचा अनोखा जुगाड; सामानाच्या जागेत झोपल्या ; पाहा VIDEO

Aeroplane Viral Video Of Grandmother: विमानाने प्रवास करायला अनेकांना आवडते. आरामदायी प्रवाससाठी अनेकजण विमानाचा पर्याय निवडतात. सध्या विमानातील वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विमानाने प्रवास करायला अनेकांना आवडते. आरामदायी प्रवाससाठी अनेकजण विमानाचा पर्याय निवडतात. सध्या विमानातील वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यात विमानात बसण्यासाठी सीट व्यवस्थित नसतात, पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळेच अनेकजण विमान प्रवासाची तुलना ट्रेनशी करतात. विमानात अनेकदा प्रवास करताना आरामदायी वाटत नाही. परंतु विमानात पाय पसरुन झोपण्यासाठी एका महिलेने जुगाड केला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटोमध्ये एक महिला झोपण्यासाठी चक्क सामान ठेवायच्या जागी झोपली आहे. विमानात प्रवाशांना बसण्यासाठी सीट असतात. त्यावर ओव्हरहेड डब्यात सामान ठेवायला जागा असते. तिथे प्रवाशांचे सामान ठेवले जाते. परंतु एक महिला चक्क या ओव्हरहेड डब्यातच झोपली आहे. याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये घडली आहे. एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमध्ये महिला सामान ठेवायच्या ठिकाणी झोपली होती. महिलेची ही कृती पाहून इतर प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

व्हायरल फोटोंवर फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी फोटोंवर मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. 'यात आमच्या बॅगाच नीट बसत नाही, तिथे या आजीबाई कशा झोपल्या'. 'एअरलाइन्समध्येही आता झोपण्यासाठी काहीही करायला लागलेत', अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT