Dog Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dog Viral Video: अरेच्चा! कुत्र्याच्या पिल्लाला लागली केकची चटक; स्वत: फ्रिजमध्ये जाऊन मारला ताव, VIDEO

Dog Viral Video Of Eating Cake: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक कुत्रा चक्क फ्रिजमध्ये जाऊन केक खाताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाढदिवस म्हटल्यावर प्रत्येकाच्या घरात केक कापला जातो. केक खायला अनेकांना आवडते. प्रत्येकाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक आवडतात. घरातील प्रत्येक व्यक्ती आणि बर्थडे पार्टीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला केक दिला जातो. परंतु तुम्ही कधी कुत्र्याला केक खाताना पाहिलंय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक कुत्र्याचे पिल्लू चक्क फ्रिजमध्ये जाऊन केक खाताना दिसत आहे.

अनेकांच्या घरात कुत्रा किंवा मांजर असते. हे पाळीव प्राणी त्यांच्या घरातील महत्त्वाचा भाग असतो. घरातील प्रत्येक कार्यक्रमात पाळीव प्राणी सहभागी असतात. मग त्यांना खेळण्यासाठी घरात वेगवेगळी खेळणी असतात.त्यांच्यासाठी त्यांचा वेगळा खाऊ असतो. कधी कधी तर मालक कुत्र्यांना त्यांच्याच ताटातील पदार्थ देतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कुत्रा केक खाण्यासाठी चक्क फ्रिजमध्ये गेल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक कुत्र्याचे पिल्लू फ्रिजमध्ये बसून केक खाताना दिसत आहे. एक व्यक्ती फ्रिजचा दरवाजा उघडते तर त्यात कुत्र्याचे लहान पिल्लू केक खाताना दिसत आहे.हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

fabian_crk28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'बापरे त्या कुत्र्याच्या पिल्लाला थंडी वाजेल', 'थंडी वाजली तरीही भूकेसाठी तो कुत्रा थेट फ्रिजमध्ये गेला', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

SCROLL FOR NEXT