Mountain Collapsed Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mountain Collapsed Video: बघता बघता अख्खा डोंगर हायवेवर आला...पापणी मिटण्याआधीच होत्याच नव्हतं झालं; आश्चर्यचकित करणारा VIDEO

Mountain Collapsed Video Viral: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रस्त्यावर संपूर्ण डोंगर कोसळला आहे. रस्त्यावर डोंगराचा काही भाग, झाडे, झुडपे पडल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची, भूस्खलन होण्याची शक्यता असते. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथे एका डोंगरात भूस्खलन झाले होते आणि डोंगराचा काही भाग खाली जमिनीवर आला होता. परंतु तुम्ही कधी पूर्ण डोंगरच जशाच्या तशा जमिनीवर आलेला पाहिलाय का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग पडलेला दिसत आहे. डोंगरावरील झाडे, झुडपे हळूहळू रस्त्यावर येताना दिसत आहे. डोंगराच्या खाली असलेली माती, त्यावरील झाडे सर्व खाली रस्त्यावर पडताना दिसत आहे. डोंगराचा मोठा भाग अचानक खाली आल्यामुळे वाहनचालकांना मात्र खूप भीती वाटली असावी.

या व्हिडिओतदेखील एक वाहनचालक आपली गाडी चालवत येताना दिसत आहे.परंतु डोंगर खाली येताना पाहून त्या वाहनचालकाने अचानक ब्रेक लावला. हा कारचालक थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. जर त्याने कारला ब्रेक लावला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

@VnsAnuTi या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा व्हिडिओ नक्की कोणत्या भागाचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

SCROLL FOR NEXT