Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नादच खुळा राव...! आजी अन् आजोबांनी धरला हलगीवर ताल; कोल्हापूरचा VIDEO पाहिला का?

Dance Video: सोशल मीडियावर एका आजींच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

Tanvi Pol

Old Lady Dance Video: कोल्हापूर नाव ऐकताच आपल्याला अनेक ऐतिहासिक गोष्टीं डोळ्यासमोर येतात. कोल्हापूरमध्ये तुम्हाला अनेक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि अनेक वस्तूही पाहण्यास मिळतात. सोशल मीडियावर या सर्व गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्याच सोशल मीडियावर एका आजींचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ गावातील एक कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. या कार्यक्रमानिमित्ताने एक आजी आणि एक आजोबा हलगीच्या तालावर उत्तमरित्या डान्स करताना दिसत आहे. गावातील काही मंडळी सर्व डान्स आनंदाने पाहताना दिसत आहेत. सध्या सर्व व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आजींचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@media_control_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''घुगुळाचा नाद मावशी जोमात'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच हजारोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोल्हापूरमधील एका गावातील असल्याचे समजत आहे. शिवाय व्हिडिओतील आजींचा डान्स पाहून बऱ्याच यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हलगी वाल्याचा नाद आणि त्यात युवराज हलगी चि साद नाद खुळा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूपच भारी आहे हे एकदा पाहिले आहे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''1नंबर मावशी''. अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Benefits: नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

South Indian Rice Dishes: तुम्हाला साउथ इंडियन डिशमधले १० वेगवेगळ्या पद्धतीचे राईस माहीत आहेत ?

Maharashtra News Live Updates: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज बाद झाल्याची अफवा; फहाद अहमद यांनी केले गंभीर आरोप

Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

Nandurbar Politics: महायुतीला धक्का, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT