Grandmother Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Grandmother Dance Video: 'हुस्न तेरा तौबा तौबा' गाण्यावर आजी आणि नातीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुमचेही पाय थिरकतील

Grandmother Granddaughter Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात आजी आणि नात विकी कौशलच्या तौबा-तौबा गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Siddhi Hande

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या तौबा-तौबा गाण्याचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी ते रिल्स स्टार्संनी या गाण्यावर डान्स केला आहे. याच गाण्यावर एका आजी आणि नातीने डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत आजी आपल्या नातीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. विकी कौशलच्या तौबा-तौबा गाण्याच्या स्टेप्स या खूप अवघड आहेत. तरीही या आजी- नातीच्या जोडीने अगदी सहजपणे या स्टेप्स केल्या आहेत. त्यांनी सेम टू सेम विकी कौशलसारख्या स्टेप्स केल्या आहेत. त्यांच्या या हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

या आजी- नातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आजी फूल जोशात डान्स करत आहे. नातीसोबत डान्स करुन त्यांनी नेटकऱ्यांनी आश्चर्यचकीत केले आहे. आजीसारखा डान्स तर तरुणांनाही जमणार नाही. एवढा जबरदस्त डान्स त्यांनी केला आहे.

ravi.bala.sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव आहे. आजी आणि नात खूपच भारी डान्स, एकच नंबर, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

दरम्यान, ज्या सोशल मीडियावर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या आजींचे नाव रवी बाला शर्मा असे आहे. त्या स्वतः एक उत्तम डान्सर आहे. त्यांचे सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT