Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कराडची सुपर आजीं; ट्रॅफिकमधून रीक्षा चालवतेय बुंगाट; पाहा व्हिडिओ

Elderly woman driving rickshaw: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील आहे. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

संभाजी थोरात, साम टिव्ही

Karad Viral Video: टू व्हीलर असो फोर व्हीलर ती चालवताना महिलांना कसरत करावी लागते. काही महिला सरावाने सराईतपणे वाहने चालवतात, तरीही मनात धाकधूक असतेच. मात्र, कराड तालुक्यातील नांदगाव येथील ६५ वर्षीय आजी चक्क गर्दीतूनही बुंगाट रिक्षा चालवतात कसलीही भीती न बाळगता या आजी सराईतपणे रिक्षा चालवताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत.

मंगला आवळे यांचे पती मुले लहान असतानाच हे जग सोडून गेले, तेव्हापासून त्या मोलमजुरी करून तीन मुली आणि एका मुलगा असा चार मुलांचा सांभाळ करत होत्या. मुलगा मोठा होऊन एसटीमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मुलींची लग्न झाली असून मुलाचाही संसार चौकोनी झाला आहे त्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च निघावा या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवळे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा(Auto) चालवण्याचा निर्णय घेतला.

वय 65 वर्ष आणि शुगरचा त्रास असणाऱ्या या आजीने पंधरा दिवसापासून रिक्षा हातात घेतली आणि पंधरा दिवसातच त्या गर्दीतूनही बुंगाट रिक्षा चालवू लागल्या आहेत त्यांच्या मुलाने त्यांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लागावा तसेच आपली आवड ही जोपासता यावी यासाठी या आजीने हे धाडस केलं आहे.

कराडमधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो. मात्र, असं असतानाही नांदगावच्या मंगल आबा आवळे या ६५ वर्षीय आजी अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाला मनापासून प्रत्येकजण सलाम करत आहे.

कराड उंडाळे या मार्गावर आजी (Old Women) प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्या रिक्षात प्रवासीही बिनधास्त बसत असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत त्या परीक्षा चालवतात खर्च वजा जातात त्यांना दररोज 500 700 रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

टीप: आज्जींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT