Marathi SOngs On DJ In London Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाण नजरेतला... लंडनच्या पब्लिकला मराठी गाण्यांनी लावलं वेड! डीजेवर चंद्राचा आवाज घुमला अन् मार्केट जाम झालं |VIDEO

Marathi Songs DJ Show In London Viral Video: मराठी गाण्यांचे वेड अगदी सातासमुद्रापल्याड गेले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Marathi Songs In London: सोशल मीडियावर म्हणजे असंख्य व्हिडिओचा खजिनाच आहे. यावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देणारे असतात तर कधी पोट धरुन हसायला लावतात.

सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये मराठी गाण्यांनी चक्क लंडनमध्ये वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा; चला जाणून घेवू... (Viral Video News In Marathi)

काय आहे व्हिडिओ?

मराठी गाणी लावलं की प्रत्येकाच अंग डुलायला लागतं. मराठी गाण्यांचा तालच असा असतो की ऐकणाऱ्याला ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. चंद्रा असो किंवा हात नका लावू माझ्या साडीला असो.. मराठी चित्रपटातील अशी असंख्य गाणी आहेत, जे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत असतात. आता हेच मराठी गाण्याचे वेड अगदी सातासमुद्रापल्याड गेले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

लंडनमध्ये अवतरली चंद्रा...

या व्हायरल व्हिडिओमध्ये लंडनमधील (London) एका कार्यक्रमामध्ये थेट मराठी गाण्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. ठाण्यातल्या एक मराठी गायक, संगीतकाराने (डीजे) ही मराठी गाणी लंडनमध्ये वाजवली आहेत. चंद्रा, रेशमांच्या रेघांनी, नाच नाच नाच राधे नाच नाच नाच, अशा फेमस मराठी गाण्यांवर लंडनच्या पब्लिकने ठेका धरल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकापेक्षा एक जबरदस्त गाण्यांनी लोकांना नाचायला लावल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ठाणेकरांचे आभार...

@kratexmusic या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये यामध्ये "रेशमांच्या रेघांनी, हिल हिल पोरी हिला, विंचू चावला, अंग नाच नाच राधे, दिसला गं बाई दिसला, वेसावची पारू नेसली गं, चंद्रा, कोण होतीस तू काय झालीस तू" ही गाजलेली मराठी गाणी वाजत आहेत.

या व्हायरल (Viral Video) व्हिडिओला "१६ जुलै रोजी आपण मराठी संगितामध्ये इतिहास घडवला, ठाणेकरांनो तुमचे खूप खूप आभार, तुमच्यासाठी काय पण" असा कॅप्शनही दिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून आत्तापर्यंत १ लाख ४४ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर पसंती दर्शवली आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT