Delhi Metro Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: बिचारा रे! शाब्दिक वाद वाढत गेला अन् गर्लफ्रेंडने सर्वांसमोर धु- धु धुतला.. व्हिडिओ व्हायरल

Couple Fighting In Delhi Metro Viral Video: सर्वांसमोर तरुणीने या तरुणीची अशी काही धुलाई केली की प्रवासी बघतच राहिले..

Gangappa Pujari

Couple Fighting Viral Video: दिल्ली मेट्रो सध्या विविध कारणांनी चांगलीच चर्चेत आहे. कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर चांगलाच संताप व्यक्त केला होता.

मात्र हे प्रकार काही थांबता थांबेनात. सध्या दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हेतर सर्वांसमोर गर्लफ्रेंडने मुलाची चांगलीच धुलाईही केली. (Viral Video News In Marathi)

काय आहे व्हिडिओ...

दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) व्हायरल व्हिडिओंची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. कधी कपलचा रोमान्स तर कधी महिलांच्या हाणामारीने मेट्रो चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर मेट्रोत नक्की चाललंय काय असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. आता पुन्हा एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडिओमध्ये तरुण -तरुणींची शाब्दिक चकमक थेट हाणामारीपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वांसमोर तरुणीने या तरुणीची अशी काही धुलाई केली की प्रवासी बघतच राहिले..गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या या मारामारीचा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. (Viral Video)

धु- धु धुतला..

व्हायरल व्हिडिओमध्ये हे कपल गेटसमोर उभे राहून बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यामध्ये चाललेली शाब्दिक चकमक वाढत जाते आणि मुलगी थेट तरुणाच्या कानाखाली लगावते. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद होतो आणि मुलगी मुलाच्या जोरजोरात कानाखाली मारत असल्याचे यामध्ये दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी त्या मुलीची चूक असल्याचे सांगत खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, या व्हिडिओमुळे मेट्रो मात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT