viral news AI
व्हायरल न्यूज

Viral News : अरे चाललंय काय? रस्त्यावरील शारीरिक संबंधाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून संताप

viral News : रस्त्यावरील शारीरिक संबंधाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Saam Tv

Viral News : काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या एका कथित राजकीय नेत्याचा हायवेवरील शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोहर लाल धाकडवर कारवाई केली होती. त्यानंतर रस्त्यावरील शारीरिक संबंधाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवर मनोहर लाल धाकडने खुलेआम एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या घटनेवरून देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. मनोहर लाल धाकडच्या कृत्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर एका दुसऱ्या व्यक्तीचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला असून आताही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याचवेळी एक जोडपे कारमध्येच शारीरिक संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे. शारीरिक संबंध ठेवणारा व्यक्ती अंदाजे ५० ते ५५ वयोगटातील दिसत आहे. एका कारचालकाने हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

जोडप्याचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ भारतातील राजकीय नेत्याचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ भारतातील कोणत्या राज्यातील आणि कोणाचा आहे, याबाबतही कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, हायवेवर केलेल्या अश्लील कृत्याच्याविरोधात कथित भाजप नेता मनोहर लाल धाकडवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी मनोहर लाल धाकडला अटक केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याने वाचकांना दाखवू शकत नाही. तसेच हा व्हिडिओ भारतातील आहे का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाईल, हे पाहावे लागेल.

टीप : लेखाशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची पडताळणी झालेली नाही. आम्ही फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. या व्हिडिओचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

High Blood Pressure: कोणतीही लक्षणं न दिसता होणारा आजार! हाय BPची कारणे वेळीच ओळखा, अन्यथा...

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले

Rakesh Bedi: अभिनेत्याने ५१ वर्ष लहान धुरंधर एक्ट्रेस साराला केलं Kiss, नेटकऱ्यांना पटलं नाही, पाहा नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT