Viral Video 
व्हायरल न्यूज

Viral Video : मगरीच्या जबड्यात त्याने डोकं ठेवलं; पुढे जे घडलं ते भयंकरच, काळजाची धडधड वाढवणारा VIDEO व्हायरल

Man Stunt With Crocodile Video : व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की तो खरोखर आपलं डोकं मगरीच्या जबड्यात ठेवतो. त्याने डोकं ठेवल्याबरोबर मगर जबडा बंद करते आणि होत्याचं नव्हतं होतं.

Ruchika Jadhav

अनेक व्यक्तींना प्राणी आवडतात. मुक्या जनावरांना बोलता येत नाही मात्र त्यांना देखील भावना असतात. प्राण्यांवर प्रेम असल्याने अनेक व्यक्ती त्यांना पाळतात. पाळीव प्राणी घरी पाळणे किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवणे, मजा मस्ती करणे ठीक आहे. मात्र अलीकडे हिंस्त्र प्राण्यांना पाळण्याचा क्रेझ सुरू आहे. अनेक व्यक्ती असे हिंस्त्र प्राणी पाळतात. तसेच त्यांच्याबरोबर काही अतरंगी स्टंट करतात. आजवर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने मगर पाळली आहे. मगर घेऊन तो स्वतः तिच्यासोबत स्टंट करत आहे. कितीही केलं तरी मगर हिंस्त्र आहे, ती मांस खाते. मात्र सोशल मीडियावर हीट होण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. या व्यक्तीने देखील असाच काळजात धडकी भरवणारा स्टंट केला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने जमिनीवर एक मगर ठेवली आहे. त्यानंतर तो या मगरीवर बसतो. तसेच तिचा जबडा आपल्या हाताने उघडतो. आता व्यक्ती कितीही स्टंट करण्याच्या विचारात असला तरी मगरीच्या जबड्यात कोणी वेडा माणूसच स्वतःचं डोकं देईल. मगर आपल्याला काहीच करू शकत नाही. मी मृत्यूला देखील टच करून परत येतो. अशा विचारात हा व्यक्ती आहे.

व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की तो खरोखर आपलं डोकं मगरीच्या जबड्यात ठेवतो. त्याने डोकं ठेवल्याबरोबर मगर जबडा बंद करते आणि होत्याचं नव्हतं होतं. जबडा बंद केल्यावर त्या व्यक्तीला स्वताच्या हाताने मगरीचा जबडा खोलता येत नाही. तितक्यात हे सर्व पाहण्यासाठी रस्त्यावर जमा झालेल्या व्यक्ती त्याच्याकडे धाव घेतात. त्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात.

@secondbrforedisaster या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अतरंगी आणि हास्यास्पद कमेंट केल्यात. या व्यक्तीचे पुढे काय झाले? तो मगरीच्या तावडीतून सुटला की नाही? याबाबत अजून काहीच माहिती समजलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT