kili Paul Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: किली पॉलही श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन; भजन गात लाखो हृदये जिंकली!

kili Paul Viral Video: काही दिवसातच प्राणप्रतिष्ठा सोहळा येऊन ठेपला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Killy Paul Sings Jai Shri Rama bhajan

सध्या गेल्या काही दिवसापासून देशभरातील लोकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची ओढ लागलेली आहे.घरोघरी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता वितरण आणि निमंत्रण दिले जात आहेत.काही दिवसातच प्राणप्रतिष्ठा सोहळा येऊन ठेपला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व श्री रामाच्या गाण्याचे रिल्स बनवताना दिसत आहेत. याबाबत सर्वत्र प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.अशातच जगप्रसिद्ध रिल्स स्टार 'किली पॉलने' एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तो 'राम सिया राम' भजन गाताना दिसत आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

रिल्स स्टार किली पॉलने इन्स्टाग्रामवरील @kili_paulया आपल्याच अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमधून असे समजते की, त्याला अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. याआधीही त्याने मराठी गाण्यावर रिल्स बनवली आहे तसेच त्याने बनवलेल्या व्हिडिओतून त्याचे भारतीय संस्कृतीवर असलेले प्रेम दिसते

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. आतापर्यंत १ दशलक्षाहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,'मस्तच भावा' तर आणखी एका यूजरने लिहिलेय की,अयोध्येत स्वागत आहे'. तसेच अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम असे लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT