Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुंबई लोकलमध्ये जन्माष्ठमीचा उत्साह निराळा; प्रवाशांनी धरला ''तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे'' गाण्यावर सुर ;पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर आपल्याला कृष्णजन्माष्ठमी संबंधिक अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत,त्यात सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी. मुंबई शहरात प्रत्येक सण-उत्सव हर्ष उत्साहात साजरे होताना आपल्याला दिसून येतात. ऐवढेच नाही तर दररोज कामाला जाणारे चाकरमानी धापवळीच्या वेळात आपल्याला मुंबई लोकलमध्ये अनेक सण साजरे करताना दिसतात.सध्या याचा प्रत्यय आपल्याला सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओमधून येणार आहे.

सध्या सर्वत्र जन्माष्ठमीची धामधुम सुरु आहे. आज रात्री प्रत्येक घरात कृष्ण जन्म सोहळा पार पडणार आहे शिवाय दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्साह होणार आहे, अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ(Video) व्हायरल होतोय. ज्यात मुंबई लोकल मधील प्रवासी जन्माष्ठमीच्या रंगात रंगून गेले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही मुंबईल लोकल(Local) मधील असल्याचे पाहू शकता.पंरतू यावेळी मुंबई लोकलमधील लेडीज कंपार्टमेंट नसून मुंबई लोकलमधील पुरुष कंपार्टमेंटमधील आहे. यामध्ये ''तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे''हे गाणे बोलताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये तुम्ही चाकरमान्याचा उत्साह आणि आनंद पाहू शकता.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील@r_r_mhatre0110 या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ (Video )पोस्ट करण्यासोबत व्हिडिओला चार हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT