Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रेल्वेच्या दरवाज्यात लटकत स्टंटबाजी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल

Mumbai Local Train Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ एका तरुणासोबत भयंकर घडले आहे. नक्की काय झाले ते एकदा व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Stunt Viral Video: लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांच्या जीवनाचा एक अविभाज्या भाग. दरदिवशी लाखो लोक आपल्या घरातून कामावर किंवा इतर कामासाठी प्रवास करत असतात. ट्रेनच्या गतीने नागरिकांची धावपळ रोज सुरु असते आणि त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळाच्या भावना असतात. मात्र अनेकदा काही लोक या प्रवासात थोडासा अॅडव्हेन्चर शोधतात आणि त्यातून जीव धोक्यात टाकतात. त्यातच नुकताच एक तरुण स्टंट करण्याच्या नादात धावत्या लोकलमधून खाली पडलेला आहे.

मुंबई शहरातील लोकलमध्ये एक तरुण प्रवास करण्यासाठी चढला. मात्र त्याने दरवाजात उभे राहून आणि स्वत:ला बाहेर झोकून देत स्टंट (Stunt) करण्याचा प्रयत्न केलाय. तरुणाची ही स्टंटबाजी सुरु असताना अचानक त्याचा तोल जातो आणि तरुण बाहेर असलेल्या खांबाला जोरदार धडकून खाली पडतो. सर्व थरारक प्रकार एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Viral) होत असून नेमकी घटना कोणत्या स्थानकादरम्याची आहे हे समजले नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''real_news___1'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक लाईक्स व्हिडिओला मिळालेले असून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

धावत्या ट्रेनला लटकत असलेला तरुणांचा जीवघेणा स्टंट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून यावर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या गेल्या. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हे सुधारणा नाहीत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नेहमीच आहे'' शिवाय तिसऱ्या यूजरने लिहिले,''असंच पाहिजे'', अशा संतापजन प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT