Grandma Dances On Kajra Re  Instagram
व्हायरल न्यूज

Viral Video : ऐश्वर्या रायच्या 'कजरा रे'वर आजीचा भन्नाट डान्स, क्यूट आजींबाईच्या अदा पाहून नेटकरी म्हणाले- तुम्ही तर...

Grandma Dances On Kajra Re Song : सोशल मीडियावर एका आजीबाईंच्या डान्स व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये आजी कजरा रे या बॉलिवूडच्या थिरकत असल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

Viral : सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या 'कजरा रे' या आयटम साँगवर थिरकताना दिसत आहे. आजींच्या या व्हायरल व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. वय झालेलं असतानाही आजींचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वृद्ध आजीबाई 'कजरा रे' गाण्यावर नाचत असल्याचे दिसते. मेहंदी कार्यक्रमात थिरकणाऱ्या आजीबाईंसह इतर नातेवाईक देखील नाचत आहेत. क्यूट आजींचे सर्वजण कौतुक करत आहेत.

कजरा रे गाण्यावर नाचणाऱ्या आजी सुरुवातीला एका व्यक्तीसोबत नाचत असल्याचे दिसते. त्यानंतर त्या एकट्या थिरकत असल्याचे पाहायला मिळते. तेथे उपस्थित असलेले काहीजण त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना, तर काहीजण आजींचा डान्स पाहताना दिसतात. आजींच्या डान्समुळे मेहंदीच्या कार्यक्रमाला चारचांद लागले असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

एका यूजरने 'वाह आजी, तुम्ही मला खुश केले. तुम्ही खूपच अप्रतिम नाचता हो' अशी कमेंट केली आहे. तर आजीसमोर सर्व डान्सर फेल झाले आहेत, असे म्हटले आहे. shubhambajpai_02 या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला १.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ७० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि दीड हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT