Lonavala Bike Stunt Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई-पुणे हायवेवर तरुणाचा जीवघेणा बाईक स्टंट, बोरघाटातला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Lonavala Bike Stunt Video: लोणावळ्यामध्ये जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात नुकताच एका बाईक रायडर्सचा अपघात झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी यासाठी तरुण-तरुणी अनेकदा जीवघेणे स्टंट करताना दिसतात. कधी चालत्या बाईकवर स्टंट, तर धावत्या ट्रेनमध्ये स्टंट तर कधी उंच ठिकाणावरून स्टंट करताना ही तरुण पिढी दिसते. पण कधी कधी हे स्टंट अनेकांचा जीव देखील घेतात. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्ये तरुणाने जीवघेणा बाईक स्टंट केला पण तो फसला. यावेळी अपघात होऊन तरूण जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यामध्ये जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात नुकताच एका बाईक रायडर्सचा अपघात झाला. या अपघातात बाईकचा चक्काचूर झाला असून बाईक रायडर जखमी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने बाईक राइडर बचावला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाईक रायडर्स लोणावळ्यातील मुंबई-पुणे महामार्गावर शनिवार आणि रविवारी बाईक रायडिंग करण्यासाठी पसंती देतात. मात्र हे करत असताना अनेक स्टंटबाजी करतात. त्यामुळे हे बाईक राइडर्स अपघाताला निमंत्रण देण्याचं काम करत असतात. त्यातच एका बाईक रायडरचा भयंकर अपघात झाला. स्टंट करतानाचा त्याचा व्हिडीओ काहिंनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

स्टंट करताना बाईक रायडरचा तोल गेला आणि अपघात झाला. या बाईक राडला गंभीर दुखापत झाली. तर त्याच्या बाईकचा अक्षरश: चक्काचूर झाला. लोणावळा महामार्ग पोलिस अधिकाऱ्यांनी बाईक रायडर्संना आवाहन केलं आहे. स्वतः बरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जाते तरी देखील हे बाईक रायडर्स आपला जीव धोक्यात घातलाना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT