CCTV Footage Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Footage : रस्त्यावरील कुत्रे मागे लागले, भीतीनं माय-लेकी स्कूटी घेऊन थेट घुसल्या घरात, VIDEO व्हायरल

Viral Video: भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी कुत्रा कोणाला चावेल हे सांगता येत नाही. कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एका मायलेकीने थेट स्कूटरच घरात नेली, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandigrah Mother Daughter Viral Video:

देशातील प्रत्येक शहरात सध्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी कुत्रा कोणाला चावेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनेकजण सावधगिरीने बाईक चालवतात. परंतु, कुत्रा कधी हल्ला करेन याचा काही नेम नाही. कुत्र्यामुळे झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत दोन महिला स्कूटरवरुन प्रवास करताना दिसत आहेत. प्रवासादरम्यान अचानक त्यांच्या मागे एक दोन-तीन कुत्रे लागतात. त्यांच्या स्कूटरच्या मागे पळायला लागतात. या महिलांना त्यावेळी एक टर्न घ्यायचा असतो. परंतु कुत्रा मागे लागल्याने त्या दोघी प्रचंड घाबरतात. त्याच नादात त्यांची गाडी भलतीकडेच गेली. ड्रायव्हरचा स्कूटरवरुन कंट्रोल सुटतो आणि स्कूटर थेट समोरच्या घराला जाऊन आदळते.

स्कूटर एवढ्या जोरात आदळते की, त्या दोन्ही महिला जोरात खाली पडतात. याचसोबत तिथे बाजूला उभी असलेली बाईकदेखील खाली पडते. सुदैवाने त्यांना काही गंभीर जखम झाल्याचे दिसत नाहीये. यानंतर कुत्रे मात्र, तिथून निघून जातात. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील सेक्टर ३८ मध्ये हा प्रकार घडला आहे. आई आणि मुलगी स्कूटरवरुन जात असताना कुत्रे मागे लागले आणि हा अपघात झाला. या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT