CCTV Footage  Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Footage : महिलेने ऑटो राईड रद्द केली, संतापलेल्या रिक्षाचालकाची महिलेला मारहाण; VIDEO व्हायरल

Viral Video : महिलेने काही वेळ रिक्षाचालकासोबत बोलणं केलं आणि काही वेळात राईड कॅन्सल केली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर ऑटोचालकाने खाली उतरून महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रविण वाकचौरे

Karnataka News :

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये रिक्षाचालकाने महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने ऑनलाईन बूक केलेली राईड रद्द केल्याने संतापलेल्या रिक्षाचालकांने महिलेवर हात उचलल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी (20 जानेवारी) बेंगळुरूच्या बेलंदूर भागात ही घटना घडली. एका महिलेने अॅपद्वारे ऑटो बुक केली होती. काही वेळातच रिक्षा तिच्या ठिकाणी पोहोचली देखील. मात्र महिलेने काही वेळ रिक्षाचालकासोबत बोलणं केलं आणि काही वेळात राईड कॅन्सल केली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला एका अरुंद रस्त्यावर उभी आहे. काही वेळात ऑटो घटनास्थळी येतो. महिलेने राइड रद्द केल्यानंतर ऑटो चालकाने लेनमध्ये यू-टर्न घेण्यास सुरुवात केली. ऑटो चालकाने यू-टर्न घेताना महिलेला उद्देशून काहीतरी म्हटलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला.

ऑटोचालकाने खाली उतरून महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑटोचालकाने महिलेला जमिनीवर ढकलून घटनास्थळावरून पळ काढला. हा गोंधळ सुरु असताना काही लोक घटनास्थळी जमा झाले. मात्र कुणीही महिलेच्या मदतीला पुढे आले नाही.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. आरोपी ऑटोचालकाला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. मात्र, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT