Viral Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: 'बन ठन चली' गाण्यावर अमेरिकन काकांचा धिंगाणा; गेटवे ऑफ इंडियासमोर धमाकेदार डान्स; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मुंबईतील लोकल ट्रेनचे तर कधी मेट्रो ट्रेनमधील. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जो एका विदेशी काकांचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला आवडतात तर काही व्हिडिओ संताप देणारे असतात. सोशल मीडियावर सध्या अमेरिकेतील रहिवासी असलेल्या वडील आणि मुलाचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व परिसर हा गेटवे ऑफ इंडियामधील आहे. जिथे व्हायरल व्हिडिओत अमेरिकेमधील डान्सिंग डॅड म्हणून प्रसिद्ध असलेले रिंकी पॉंड हे आपल्या मुलासोबत डान्स करत आहेत ते ही गेट वे ऑफ इंडियासमोर. मात्र तुम्हाला व्हिडिओ पाहून आवडेल की दोघेही एका बॉलिवूड (Bollywood) गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर यांचे डान्स व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यामुळे नेटकरी वर्गात ते कायम चर्चेत असतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत (Video) तुम्ही पाहू शकता, सर्व व्हिडिओत गेटवे ऑफ इंडियाचा परिसर आहे. अनेक नागरिकांची ये-जा सुरू आहे. अशात दोघेही गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभे आहेत; मात्र काही वेळातच दोघे डान्स करण्यास सुरुवात करतात. तेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध ''बन ठन चली'' या गाण्यावर. दोघांचा डान्स करण्याचा उत्साह (excitement) पाहून गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील सर्व नागरिक त्यांना पाहण्यासाठी थांबतात.

डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (Instagram) ''@ricky.pondand dallin.pond''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये '' आम्हाला माहिती नाही की जेव्हा आम्ही डान्स केला, त्यामुळे कोणाच्या डान्समुळे जास्त गर्दी जमा झाली'' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट होताच १२ मिलियनहून अधिक प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओला पसंतीही अधिक मिळत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया (reaction) नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'मस्तच डान्स केला रे'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'भारतात तुमचे स्वागत'',अशा अनेक प्रतिक्रिया अनेक यूजर्सने दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ आणि त्याची माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

SCROLL FOR NEXT